तुळजापूर (प्रतिनिधी)- भाडेपट्ट्याने जमीन घेऊन, ठरलेप्रमाणे भाडे न देता गत दोन वर्षाचे भाडे दिले नसल्यामुळे फसवणूक केलेल्या इनरिच सोलार सर्व्हिस प्रा.लि. (U74900PN2013PTC147119)या कंपनीविरुद्ध भा.दं.वि. 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सिता व राम गोरे हे कंपनी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहे.

या प्रकरणी तुळजापूर तहसिलदार  यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, माझे पत्नीचे नावे (सौ. सिताबाई रामा उर्फ राम गोरे) मौजे दहिवडी शिवारात गट क्र. 139 मध्ये जमीन आहे. या जमिनीमध्ये इनरिच सोलार सर्व्हिस प्रा.लि. (U74900PN2013PTC147119) या कंपनीने विद्युत तारेचे पोल उभे करणेबाबत करार केला होता. सदरील करारान्वये कंपनीने भाडे दिलेले नाही. सदरील कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क केला असता उडवाउडवीची उत्तरे देणे, तुमच्यावर व तुमच्या संपूर्ण कुटुंबावर मी पोलीस केस करतो अशी धमकी देणे, केस करणेबाबतचा प्रयत्न देखील त्यांनी केला आहे. माझा लहान मुलगा बसवेश्वर राम गोरे हा भारतीय सैन्य दलात सेवेत आहे. त्यावर देखील गुन्हा दाखल करतो असे वारंवार धमकीचे प्रकार घडत आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा मागणीसाठी 4 मार्च 2024 ला निवेदन दिले होते. याची दखल न घेतल्याने अखेर सीता व राम गोरे दांम्पत्य कंपनी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत.


 
Top