भूम (प्रतिनिधी)- नुकताच सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात रविंद्र हायस्कूलच्या परीक्षेस बसलेल्या 12 विद्यार्थ्यांपैकी 12 विद्यार्थी सैनिकी स्कूल प्रवेशासाठी पात्र झाले. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवलेल्या रविंद्र हायस्कूलने  सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेतही लावला 100% निकाल लागला आहे. 

पात्र झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे. होळकर हिरणमई सचिन 212 गुण, कोल्हे अनुश्री औदुंबर 207 गुण, बोराडे राजलक्ष्मी आबासाहेब 205 गुण, मोटे स्वरांगी संदीप 174 गुण, जानकर वैष्णवी विलास 172 गुण, हराळ संग्राम दत्तात्रय163 गुण 7)वाघमारे शौर्य गणेश158 गुण, साठे शरयू दत्तात्रय 156 गुण, माळी दुर्वा गणेश 155 गुण, वाघमारे कीर्ती बाळासाहेब 140 गुण, माळी सत्यजित भोलेनाथ 124 गुण, शेंडगे समर्थ विजय 184गुण. या यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे सचिव  आर.डी.सुळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रशालेच्या वतीनेही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.


 
Top