तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील वडगांव लाख ते खंडाळा रस्ता वर  अतिक्रमण करुन अजमेरा आणि जेएसडब्लु  कंपनीने शेतकऱ्याच्या वावरातून गुंडशाही करुन वहाने घेवून जात आहेत. यात शेतकऱ्यांच्या पिकांचे, जमिनीचे मोठे नुकसान होत आहे. तरी या प्रकरणी दोन्ही कंपनीवर कारवाई करावी अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा अमोल जाधव सह अन्य शेतकऱ्यांनी तहसिलदार यांना निवेदन देवुन दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे कि  अजेमरा कंपनीची  खन काम चालून आहे. वडगांव खंडाळा शिवरस्ता असून, वडगांवच्या शेतकऱ्याने स्वताच्या मालकीची शेती देवून रस्ता केला होतो. अजमेरा यांनी तिथे शेती विकत घेवून तो रोड वडगांव शिवारात ढकलला आहे. शिव रस्ता बूजवून अतिक्रमण केला आहे. जेएसडब्लु  कंपनीने  शेतकऱ्यांना विचारात न घेता गुंडशाही, दडपशाही करुन शेतकऱ्याच्या वैयक्तीक रस्त्यातून वाहाने घेवून जात आहेत. यात पिकाची नुकसान होत आहे. तरी पहाणी करुन रस्ता मोजणी करुन दोषीं अंती दोन्ही कंपनीवर कार्यवाही न केल्यास अमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. या निवेदनावर अमोल शिवाजीराव जाधव  वडगांव लाख सह अठरा शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.


 
Top