तुळजापूर (प्रतिनिधी)-  लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील दोन हजार फलक यंत्रणेने हटवले. तसेच कोनशिला व शाखापक्ष बोर्डवर फडके बांधण्यात आले. यामुळे शहर आणि ग्रामीण भागाने मोकळा श्वास घेतला. यामुळे तालुक्यातील दादा, अण्णा, भाऊ, भैय्या, साहेब सह नामवंत नावे  जमीनीवर आले.

शहरासह ग्रामीण भागातसुद्धा अलीकडच्या काळात अवैध डिजिटल बॅनर, फलक, पोस्टर्स, बोर्डचे पेव फुटले आहे. यावर संबंधित ग्रामीण भागात ग्रामपंचायत, शहरी भागात नगरपालिका या यंत्रणेने विना परवानगी फलक विरोधात मोहीम घेतली.आदर्श आचार संहिता काळात डिझीटल बऩर मुळे वातावरण गढुळ होवुन  वादविवाद निर्माण निवडणूक काळात शांतता धोक्यात येण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांवर ताण पडण्याची शक्यता होती. तुळजापूर तालुक्यात  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष, संघटनांचे फलक झाकले गेले. निवडणूक अनुषंगाने निवडणूक अधिकारी पहिल्या टप्प्यात शासकीय

जागेवरील, सार्वजनिक जागेवरील, त्यानंतर खासगी जागेवरील फलकांना मुदत दिली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

यामध्ये शहरी भागात नगरपालिका कर्मचारी, तर ग्रामीण भागात तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, कोतवाल महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागाचे विद्रुपीकरण करण थांबण्यास मदत झाली. या विधानसभा मतदार संघात सुमारे ऐंकशे ऐंशी  गावं आहेत. आचारसंहिता सुरू होताच पहिल्या टप्प्यात निवडणूक विभागाने फलक हटवायचे काम हाती घेतले. बरेच फलक कापडाने झाकले गेले. राजकीय पक्षांनी घरावर का नुकतेच काढलेले पक्ष चिन्हावर   शहरात पांढरा रंग पुसुन चिन्ह पुसण्यात आले. या मोहीत शहरातील व गावातील चौकातील डिझीटल हटविण्यात आले. तसेच पक्षबोर्ड कोनशिला यावर पेपर चिटकविण्यात आले तर काही ठिकाणी यावर फटकरे बांधण्यात आले.


 
Top