तुळजापूर (प्रतिनिधी)- स्पर्धा परीक्षेच्या निकालात अपेक्षेप्रमाणे यश मिळणे आणि अपयश आले तर पुन्हा जोमाने तयारी करून यशाचे शिखर गाठणे हा काळ सत्व परीक्षेचा असतो. खऱ्या अर्थाने या परीक्षेत मिळालेले यश म्हणजे जिद्द चिकाटी परिश्रमाचे फळ असते. जिद्द चिकाटी अभ्यासातील सातत्याच्या जोरावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील महेश प्रभाकर गवळी या पंचवीस वर्षीय तरुणाने जिद्द चिकाटी अभ्यासातील सातत्याच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या परीक्षेत यश मिळवत विक्रीकर निरीक्षक या पदावर गवसणी घातली होती. राजपत्रित अधिकारी म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर या आठवड्यात त्यांची उपशिक्षण अधिकारी म्हणून निवड झाली आहे. 

कष्टाची तयारी ठेवल्यास आयुष्यात काही अशक्य नसते असा संदेश जणू त्यांच्या यशातून दिला आहे. सावरगाव येथील महेश सुरवसे यांची कौटुंबिक परिस्थिती सर्वसाधारण असून महेशचे प्राथमिक शिक्षण येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. तर पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुणे गाठले. पुण्यातच अर्धवेळ नोकरी करून पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी अर्धवेळ नोकरी करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. 2021 मध्ये दिलेल्या परीक्षेचा निकाल 2023 ला जाहीर झाला. त्यात महेश सुरवसे यांची राजपत्रित अधिकारी म्हणून निवड झाली होती. मागील आठवड्यात त्यांची उपशिक्षणाधिकारी निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.


 
Top