धाराशिव (प्रतिनिधी)- जनतेचा मिळत असलेला प्रचंड प्रतीसाद यामुळेच विरोधकांना अजुनही माझ्या विरोधात सक्षम असा उमेदवार देता आला नाही. असे मत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उमरगा तालुक्यातील कोथळी, कंटेकुर, मुरळी, औराद येथील जनसंपर्क दौऱ्यात व्यक्त केले.

राज्यातील महायुतीने आपल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द केली असून धाराशिव लोकसभा मतदार संघात मात्र महायुतीला सक्षम असा उमेदवार शोधताना दमछाक होत आहे. यावरुन मी कार्यक्षम आहे की नाही हे सिध्द होते. असे खासदार राजेनिंबाळकर म्हणाले. पुढे बोलताना खासदार राजेनिंबाळकर यांनी  महाविकास आघाडी सरकारच्या काळात धाराशिव जिल्हयामध्ये वैद्यकीय महाविद्यालय पाठपुरावा करुन मंजुर करुन घेतले. तसेच तुळजापुर धाराशिव रेल्वे मार्गाचे सन 2014 साली घोषणा करुनही रखडलेले काम मार्गी लावून भुसंपादन प्रक्रीया  चालू केली आहे. अशाच प्रकारे सोलापुर-उमरगा महामार्गाचे रखडलेले काम देखील अंदोलनात्मक मार्गाने टोलवसुली बंद करुन शिवसेना स्टाइलने चालू करण्यास भाग पाडले. शेतकऱ्यांच्या दैनंदिन आडचणीचा महत्वाचा मुद्दा म्हणजे महावितरणच्या सुधारीत विद्युत वितरण होण्याच्या धोरणात्मक एकुण जिल्हयातील 1303 कोटी रुपयाचा आराखडयाच्या मंजुरीने विद्युत पुरवठयातील येणाऱ्या अडचणी भविष्यात कमी होतील.

यावेळी माजी जिल्हा परीषद उपाध्यक्ष केशव उर्फ बाबा पाटील, उपजिल्हाप्रमुख बसवराज व्हरनाळे, माजी पं. स. सदस्य शिरीष पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख विजयकुमार नागने, जिल्हा संघटक दिपक जवळगे, माजी पंचायत समिती सदस्य विलास व्हटकर, चेतन पाटील, माणिक बुआ,  महेश चौगुले, ऋषीकेश कदम, निळकंठ स्वामी, श्रीमंत भुरे, आक्षय कुलकर्णी, नसीम शेख, रवी जमादार, विलू भोसले, चेतन पाटील यांच्यासह  पदाधिकारी नागरीक मोठया संख्येने उपस्थीत होते.


 
Top