धाराशिव (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मनिषा पाटील यांच्या संपर्क कार्यालयात आढावा बैठक घेण्यात येऊन या बैठकीमध्ये नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी दि.20 मार्च रोजी करण्यात आल्या.

धाराशिव शहरातील मनिषा राखुंडे-पाटील  यांच्या संपर्क कार्यालयात महिला कार्यकर्त्यांची आढावा बैठक जिल्हाध्यक्षा मनिषा राखुंडे - पाटील व जिल्हा उपाध्यक्षा शोभा मस्के यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी राखुंडे पाटील म्हणाल्या की, पक्षप्रमुख खासदार शरद पवार यांनी महिलांना राजकीयदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पंचायत राज म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देऊन महिलांना राज्य कारभार करण्याची संधी उपलब्ध करून केली. तर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी मदत करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे अतिशय महत्त्वाचे काम केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उमरगा तालुकाध्यक्षपदी संगीता सलगर, तुळजापूर तालुकाध्यक्षपदी मनिषा काशिद, कळंब तालुकाध्यक्षपदी सलमा सौदागर, उमरगा तालुका उपाध्यक्षपदी यशोदा पवार व नागिनी कांबळे, तुळजापूर तालुका उपाध्यक्षपदी रेणुका सुरवसे, कळंब तालुका उपाध्यक्षपदी सुमती तोंरसले, उमरगा शहराध्यक्षपदी राजश्री सुरवसे, दिपाली कुलकर्णी, उमरगा तालुका कार्याध्यक्षपदी अमिना मुजावर यांची तर शहर उपाध्यक्षपदी संगीता मोरे यांची निवड करण्यात आली. या पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर पक्षाच्या जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, महिला जिल्हाध्यक्ष मनिषा राखुंडे - पाटील, युवक जिल्हाध्यक्ष शेखर घोडके यांनी सत्कार केला.


 
Top