परंडा (प्रतिनिधी)-अंतरवली सराटीच्या रविवार (दि.24) निर्णायक महाबैठक व मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शक सूचना , आदेशा नुसारच पुढील रणनिती ठरविण्याचा व या निर्णायक महाबैठकीस तालुक्यातून मोठया संख्येने सहभागी होण्याचा निर्णय परंडा येथील सकल मराठा समाज बैठकीत घेण्यात आला.

यावेळी मोठया संख्येने समाज बांधव उपस्थित होते. येथील कमांडो करीअर अकॅडमी येथे बैठक घेण्यात आली. यावेळी लोकसभा निवडणूक याबाबत ही चर्चा करण्यात आली. या अनुषंगाने गावनिहाय किमान 2 उमेदवार देण्यासाठी सुचक, अनुमोदक यांच्यासह उमेदवारी दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्र, गावनिहाय मतदार यादी, मराठा मतदार एकूण संख्या, गाव वर्गणीतून सर्व खर्च करणे, जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय समिती गठीत करणे व शहरातील  प्रभाग, गाव, वस्ती आदि ठिकाणी बैठका घेणे. तसेच जे समाज बांधव, पुढारी, पदाधिकारी समाज सोडून केवळ अन्‌‍ केवळ राजकीय पक्षाचेच काम करतात त्यांना बहिष्कृत करणे आदि निर्णय घेण्यात आले.


 
Top