तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प गुंफताना प्रा.ए.डी.जाधव ज्येष्ठ अभ्यासक सोलापूर यांनी वरील प्रतिपादन केले.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना ते म्हणाले की, बापूजींनी महाराष्ट्रभरात शिक्षणाचे उत्तम बीज पेरले. त्यांचे उत्तम व्यवस्थापन केले,व उत्तम कापणी केली, म्हणजेच हे उच्च शिक्षणाची, ज्ञानदानाची,संस्कारांची, आधुनिकतेची शेती त्यांनी केली आहे. ज्या शेतीमुळे खरं तर अखंड महाराष्ट्र शैक्षणिकरित्या सुजलाम सुफलाम झाल्याचे दिसून येते. समाजाला गरज असते ते दिशा दाखवणाऱ्या माणसांची ते कार्य बापूजींनी केले. दिशाभूल करणाऱ्या लोकांच्या मांदियाळी मध्ये बापूजींची विचारधारा चांगल्या माणसाला नक्कीच वाचवू शकेल.महात्मा गांधीजींना ज्याप्रमाणे समाजाने साथ दिली कारण ते सत्याच्या मार्गावर चालले म्हणून. तशीच बापूजींना समाजाची साथ यासाठी मिळाली की, ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होते. आणि खरेपणाला समाज नेहमीच साथ देतो. बापूजींनी समाजाला एक विश्वासाचा चेहरा दिला. हा विश्वास कमविणे इतके सोपे नव्हते.सदर प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.कायला कृष्णमूर्ती, शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय धाराशिव यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य मेजर डॉ. प्रोफेसर यशवंतराव डोके यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय प्रा. श्रीमती एस.एम.कदम यांनी केला.सदर प्रसंगी मराठी विभाग प्रमुख व व्याख्यानमाला समन्वयक प्रा. राजाभाऊ जगताप, नॅक समन्वयक डॉ. नेताजी काळे यांच्यासह सर्व शिक्षक तसेच सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. व्याख्यानमाला यशस्वीतेसाठी प्रा.धनंजय लोंढे यांच्या सह सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांचे उत्तम सहकार्य लाभले.सूत्रसंचालन डॉ.सी.आर.दापके यांनी केले तर आभार डॉ.मंत्री आर. आडे यांनी मानले व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प प्र. प्राचार्य मेजर डॉ प्रोफेसर यशवंतराव डोके यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.


 
Top