उमरगा (प्रतिनिधी)-भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्वतंत्र विचारधारा आहे. अनेक नेते आले आणि गेले पण. बहुजन समाज आणि सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत. आजच्या दिशभुल करणाऱ्या परिस्थीत काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आणि आश्लेष मोरे, सचिव धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी, यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्ह्यात पक्षाची उभारी होईल. त्यासाठी काँग्रेस पक्षाची विचारधारा सर्वसामान्यापर्यंत पोहचवण्याचे कार्य करावे. राष्ट्रीय पातळीवर संपूर्ण मदत आणि साथ देण्याचे आमदार अमित देशमुख यांनी केले. काँग्रेस पक्षाचे राज्याचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी काँग्रेसचा राजीनामा देवून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचा हा पहिलाच कार्यक्रम झाला आहे.

उमरगा आणि लोहारा तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करताना आमदार अमित देशमुख बोलत होते. 

यावेळी पक्षांनी दिलेली कोणतीही जबाबदारी पार पाडण्याचे आश्वासन आश्लेष मोरे यांनी दिले. उमरगा - लोहारा तालुका काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यास परवानगी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी अमर खानापुरे सरचिटणीस प्रदेश  काँग्रेस कमिटी, गिरीश पाटील माजी सभापती लातूर, अभय साळुंके सचिव प्रदेश काँग्रेस कमिटी, दीपक सुळ माजी महापौर, श्रीशैल उटगे जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमिटी लातूर, धीरज पाटील जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमिटी धाराशिव व इतर पदाधिकारी तसेच काँग्रेस पक्षाचे उमरगा आणि लोहारा तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top