धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्ह्यातील मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या बाजार समितीच्या आवारात अंतर्गत रस्ते, नाली, संरक्षण भिंत, शेतकरी सभागृह जनावरांचे शेड कायमस्वरुपी विद्युत पुरवठा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने बाजार समितीचे संचालक उमेश राजे यांच्या पुढाकाराने हे आंदोलन करण्यात आले. 

धाराशिव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये गेल्या अनेक वर्षापासून कुठल्याही प्रकारचा निधी आलेला नसून आजतागायत एकही विकास कामे त्या ठिकाणी झालेले नाहीत. या बाजार समितीमध्ये फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणात येतो. त्या आवारात रस्ता, नाली भाजीपाला लिलावाचे शेड, येणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकरी सभागृह स्वच्छतागृह उपलब्ध नसल्याने या सर्वांची मोठी तारांबळ होत आहे.

तसेच भुसार मालाचे अडत्यांच्यासमोर आवश्यक रस्ता, नाली स्वच्छतागृह उपलब्ध नसल्याने या सर्वांचे हाल होत आहेत हीच अवस्था जनावरांचा बाजार याठिकाणी आहे. त्यांना देखील कायमस्वरुपांचे शेड, जनावरे बांधण्याचे व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अंतर्गत रस्ता, नाली व निवारा याची नितांत गरज असून बाजार समितीने आजतागायत कुठलीही सुविधा त्या ठिकाणी पुरविलेली नाही. तसेच संपूर्ण बाजार समितीला संरक्षीत भिंत, आवक-जावक गेट व कायमस्वरुपी सुरक्षा रक्षक याची नितांत गरज असताना देखील सभापती व संचालक या कामाकसे दुर्लक्ष करीत आहेत याच प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आज अखिल भारतीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बाजार समिती कार्यालयाला टाळे ठोकले दरम्यान सभापती व काँग्रेसचे बाजार समिती संचालक उमेश राजे निंबाळकर यांच्यात बाचाबाची चा प्रकार घडला बाजार समितीला आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी निधी आणला असून या निधीमुळेच हे आंदोलन केले जात असल्याचा आरोप सभापतींनी केला आहे तर उमेश राजे म्हणाले की आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आजपर्यंत निधी का दिला नाही दिला असेल तर तो सांगावा  निवेदन देऊन आठ महिने लोटले तरी देखील बांधल्या ना पाण्याची व्यवस्था केली. सभापती यांनी आंदोलन करण्यास मज्जाव केल्यामुळे संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे आंदोलन अधिक तीव्रतेने केल्याचे उमेश राजे निंबाळकर यांनी सांगितले.

यावेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष खलील सय्यद,जिल्हा संघटक काँग्रेस राजाभाऊ शेरखाने,बाजारसमिती संचालसक उमेश राजेनिंबाळकर,काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, डॉ शहापुकार मॅडम ,काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे ,सिद्धार्थ बनसोडे,धनंजय राऊत,अभिषेक बागल,संजय गजधने,बाबा मोमीन,प्रभाकर लोंढे,महादेव पेठे,कफील खलील सय्यद ,बडूरकर सर ,सौरभ गायकवाड व सर्व भाजीपाला व्यापारी ,भुसार मालाचे व्यापारी ,जनावराचे व्यापारी,समिती मधील हमाल मोठ्या संख्येने उपस्तित होते .


 
Top