धाराशिव (प्रतिनिधी)- शासकीय महिला रुग्णालयात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली,नुकतेच जन्मलेल्या बाळासह पाच वर्षाच्या बाळापर्यंत पोलिओचा डोस पाजण्यात आला,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतिफ अब्दुल मजीद तर प्रमुख पाहुणे म्हणुन ईथिकल कमिटी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सदस्य गणेश रानबा वाघमारे हे होते. वैद्यकीय अधीक्षक डॉ स्मिताताई गवळी यांनी पोलिओ आजाराविषयी माहिती दिली.

जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने या रोगाची कारणे शोधुन लक्षणावरती उपाय म्हणुन पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येते.गेल्या चाळीस वर्षापासुन आपल्या देशात पोलिओचे समुळ नाश करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे,आलेल्या पाहुण्यांचे स्वागत वैद्यकीय अधिक्षक डॉ स्मिताताई गवळी यांनी पुष्पगुच्छ देऊन केले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेटरन भंडारी मॅडम यांनी केले तर आभार डॉ स्मिताताई गवळी यांनी मानले,तसेच छत्रपती शिवाजी हायस्कूल येथेही पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत अब्दुल लतिफ व गणेश रानबा वाघमारे यांनी उपस्थिती लावुन तेथे आलेल्या बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले,या पल्स पोलिओ बुथवर बारा वाजेपर्यंत 91 बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले होते, कार्यक्रमास वैद्यकीय अधीक्षक डॉ.स्मिताताई गवळी,रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतिफ अब्दुल मजीद,ईथिकल कमिटी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सदस्य गणेश रानबा वाघमारे,मेटरन भंडारी मॅडम, नागटिळक एस ए,अतार भांडे रमेश गंगावणे,अन्य इतर उपस्थित होते.


 
Top