धाराशिव (प्रतिनिधी)- स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा  माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली  धाराशिव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे यांनी दिली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. इंगळे यांनी शेतक ऱ्यांच्या विविध प्रश्नावर आवाज उठवला आहे. खरीप, रब्बी पीकविमा, अतिवृष्टीमुळे झालेली पीक नुकसान भरपाई, कांदा अनुदान, दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत, दुष्काळी उपाय योजना राबवाव्यात,  शेतमालास उत्पादन खर्च व 50 टक्के नफा या प्रमाणात दर द्यावा, कारखानदारांकडून ऊसाला एफआरपीप्रमाणे दर मिळावा, कांदा निर्यात बंदी उठवावी, दूध दरवाढ करावी, महामार्ग, रेल्वे मार्ग व प्रकल्प बाधीत शेतकऱ्यांना योग्य मावेजा द्यावा आदीसह शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध मागण्यांसाठी श्री. इंगळे यांनी   रास्ता रोको, धरणे आंदोलन, निदर्शने आंदोलन केले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. जिल्हयात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमकपणे भूमिका  मांडणारे व्यक्तीमत्व म्हणून इंगळे यांची ओळख आहे. धाराशिव लोकसभा मतदार संघात श्री. इंगळे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह पक्षाची पाळेमुळे खोलवर रुजवली आहेत. सर्वसामान्यासह गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लढणारे व्यक्तीमत्व म्हणून  इंगळे यांची ओळख आहे. इंगळे यांचे शेतकऱ्यासह सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी गत 20 ते 25 वर्षापासून निरंतर कार्य सुरू आहे . इंगळे यांना माननारा मोठा वर्ग धाराशिव लोकसभा मतदार संघात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खा. शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली  धाराशिव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा मनोदय इंगळे यांनी व्यक्त केला आहे.


 
Top