धाराशिव (प्रतिनिधी)- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने धाराशिव येथे गुरुवारी (दि.28) तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. जयंती उत्सवानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळे, माजी नगराध्यक्ष प्रदीप साळुंके, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, शहरप्रमुख सोमनाथ गुरव, पांडुरंग भोसले, दीपक जाधव, दादा कोळगे, हनुमंत देवकते बाळासाहेब दंडनाईक, बंडू आदरकर, सुरेश गवळी, राजाभाऊ पवार, तुषार निंबाळकर, बाळासाहेब काकडे, पंकज पाटील, मुजीब काझी, गणेश राजेनिंबाळकर, राणा बनसोडे, नितीन शेरखाने, राम साळुंके, देवानंद एडके, सुनील वाघ, सतीश लोंढे, यशवंत शहापालक, संकेत सूर्यवंशी, प्रशांत जगताप, महेश लिमये, संदीप शिंदे, कालिदास शेरकर, मुकेश चौगुले, लक्ष्मण जाधव, राकेश कचरे, राकेश सूर्यवंशी, साजीद पठाण, कलीम कुरेशी, गफूर शेख, साबेर सय्यद, अमित जगधने, पिंटू आंबेकर यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते


 
Top