तुळजापूर (प्रतिनिधी) - तिर्थक्षेञ तुळजापूर येथे  श्रीतुळजाभवानी मंदिरातील होमकुंडा समोरील  होळीचे  विधीवत  पुजन करुन  प्रज्वलित करण्यात आली. मानाची होळी महंत मावजीनाथ महाराजांच्या हस्ते प्रज्वलित झाल्यानंतर शहरातील गल्लोगल्लीतील होळ्या पेटवुन होळी भोवती बोंब मारुन होळी सण पारंपारिक पध्दतीने मोठ्या साजरी करण्यात आली.

होळी सणाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी देवींच्या अभिषेक पुजेनंतर मंदिरातील गोवऱ्यांच्या होळीचे पुजन  करुन पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर होळी प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर तिर्थक्षेञातील मठे, मंदीरे व घरासमोरील होळी प्रज्वलित करण्यात आल्या.


होळीचे महंत मावजीबुवा यांच्या हस्ते प्रज्वलन 

तिर्थक्षेञ तुळजापूर येथील शुक्रवार पेठ भागातील  मानाच्या होळीचे पुजन महंत मावजीनाथ बुवा यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर होळी प्रज्वलित करण्यात आहे. विशेष म्हणजे महंत मावजीनाथ बुवा हे वर्षातुन फक्त दोन दिवस वेळी मठा बाहेर  येतात. एक  हुताशनी पोर्णिमा दिनी होळी प्रज्वलित करण्यासाठी तर दिपावलीच्या अमावस्या दिनी श्रीतुळजाभवानी मंदिरात श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ येतात.


कलगी तुरा गीत गायन परंपरा खंडीत !

तिर्थक्षेञी तुळजापूरात पुर्वी होळी राञी कलगी तुरे वर डफ वाद्याच्या गजरात गीत गावुन या गीतांवर जुगलबंदी होवुन होळी साजरी केली जात होती. ती परंपरा  आता खंडीत झाली आहे.


 
Top