धाराशिव (प्रतिनिधी)- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या व महात्मा ज्योतीबा फुले यांच्या 197 व्या जयंतीनिमित्त विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील जिल्हा परिषदेच्या अधिनस्त व फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित मोकळ्या जागेत जयंतीनिमित्त बैठक घेण्यात आली. बैठकीत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सामाजिक उपक्रम राबवुन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दि.11 एप्रिल पासुन ते दि.14 एप्रिल पर्यंत महामानवाच्या कार्यप्रणालीवर चित्र प्रदर्शन, तथागत गौतम बुद्ध स्मारक देखावा, गुणवंतांचा सत्कार, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबीर,नेत्र तपासणी, बिपी,शुगर तपासणी तर भोजनदानासह विविध समाज प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमास दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सह सर्व क्षेत्रातील मान्यवर नागरिक उपस्थित राहणार आहेत. महामानवास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भीम अनुयायीसाठी पाणी व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीचे गणेश वाघमारे यांनी सांगितले. यावेळी फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीचे अंकुश उबाळे, बाबासाहेब बनसोडे, धनंजय वाघमारे, बलभीम कांबळे, रमेश कांबळे, बाबासाहेब गुळीग, गणेश रानबा वाघमारे, संजय गजधने, संग्राम बनसोडे, प्रविण जगताप, संपतराव शिंदे, दिपक पांढरे, स्वराज जानराव, विशाल घरबुडवे, श्रीकांत गायकवाड आदी उपस्थित होते.