तुळजापूर (प्रतिनिधी)-  देशपातळीवर जे मोठ - मोठे अधिकारी बनतात ते अशा सरकारी शाळांमधूनच शिकून येत असल्याचे स्पष्ट करुन मी ही अशाच शाळेत शिकुन  भारतीय प्रशासन सेवेत दाखल झाल्याची  माहीती न.प.च्या नूतन मुख्याधिकारी श्रीमती प्रियवंदा म्हाडदळकर (भा. प्र. से.) यांनी  9001:2008 मानांकित न. प. शाळा क्रमांक 3 तुळजापूर खुर्द  येथे सदिच्छा भेट दिली असता विध्यार्थांशी संवाद साधताना दिली.

सध्या देशपातळीवर जे मोठ -मोठे अधिकारी बनतात ते अशा सरकारी शाळांमधूनच शिकून येत असल्याचा आवर्जून उल्लेख ही मुख्याधिकारी म्हाडदळकर यांनी यावेळी केला. मी स्वतःही अशाच सरकारी शाळेतून शिकून भारतीय प्रशासन सेवेत दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले. शाळेत चालणारे डिजिटल वर्ग, संगणक प्रयोगशाळा,विज्ञान प्रयोगशाळा इत्यादी पाहून म्हाडदळकर यांनी शाळा व्यवस्थापन समिती आणि न. प. अधिकारी आणि पदाधिकारी, गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुकही केले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा लक्ष्मीताई रणजीत भोजने, कार्यालयीन अधीक्षक वैभव पाठक,आस्थापना विभाग प्रमुख  प्रफुल्लता बरूरकर, शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम मोटे,  शाळेतील शिक्षक सतीश यादव, निर्मला कुलकर्णी, अशोक शेंडगे, जालिंदर राऊत, पुष्पा काळे, अतुल काकडे, अनिल राठोड, रंजीत नाईकवाडे, पालक रणजित भोजने, दीपक भोजने, कल्पना व्हटकर, संदिप माने, मिनाबाई वाळा इत्यादी उपस्थित होते.


 
Top