भूम (प्रतिनिधी)-येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये सन 2025मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा व इयत्ता आठवी NMMS परीक्षा या परीक्षांची विशेष तयारी करून घेण्यासाठी वासंतिक वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. 1 मार्च ते 30 मे पर्यंत हे वासंतिक वर्ग घेण्यात येणार आहेत.  यामध्ये अध्यापन करणाऱ्या घटकावर परीक्षा घेतली जाणार आहे.

या वासंतिक वर्गाचे उद्घाटन पंचायत समिती भूमचे गटशिक्षणाधिकारी राहुल भट्टी व गटशिक्षण कार्यालय पंचायत समिती परांडा येथील गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव व भोनगिरीचे पालक बाशाभाई पटेल यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष तात्या कांबळे होते.


 
Top