धाराशिव (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानामध्ये खासगी व्यवस्थापन गटामधून जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल श्रीपतराव भोसले हायस्कूलचे प्राचार्य साहेबराव देशमुख यांचा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. दयानंद जटनुरे यांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.

निमित्त होते माध्यमिक शिक्षकांच्या प्रशिक्षण वर्गाला सदिच्छा भेट देण्यासाठी गेले असता प्रा . डॉ .दयानंद जटनुरे यांनी प्रशालेच्या प्राचार्यांचा  सत्कार या वेळी केला. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे राज्यस्तरीय अभियान शासकीय व खासगी व्यवस्थापनातील सर्वच माध्यमांच्या शाळेकरिता आयोजित करण्यात आले होते. राज्यातील सर्व शाळेने सहभाग नोंदवून आपल्या प्रशालेच्या भौतिक सुविधासह शैक्षाणिक गुणवत्ता वाढवून या अभियानाला उत्तम प्रतिसाद दिला. त्याचाच एक भाग म्हणून श्रीपतराव भोसले हायस्कूलने जिल्हयात खासगी व्यवस्थापन गटात प्रथम क्रमांक पटकावला तर लवकरच रुपये अकरा लाखाचे  बक्षीस वितरण शासकीय समारंभात  वितरीत केले जाईल. या प्रसंगी उपमुख्याध्यापक एस.बी कोळी, उपप्राचार्य  संतोष घार्गे, पर्यवेक्षक  के. वाय. गायकवाड, धनंजय देशमुख, निखीलकुमार गोरे, प्रा. नंदकुमार नन्नवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.


 
Top