धाराशिव (प्रतिनिधी)-महाविकास आघाडीचे स्वयंघोषित उमेदवार ओम राजेनिंबाळकर ठिकठिकाणी प्रचारादरम्यान न केलेल्या विकास कामाचे श्रेय घेत आहेत अशी टिका भाजपाचे धाराशिव लोकसभा संयोजक नितीन काळे यांनी पत्रकार परिषदेत केली. 

रविवार दि. 24 मार्च रोजी घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेस जि. प. चे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, माजी उपनगराध्यक्ष अभय इंगळे, ॲड. खंडेराव चौरे, राजसिंह राजेनिंबाळकर, शिंदे आदी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत बोलताना नितीन काळे यांनी 2011 साली डॉ. पद्मसिंह पाटील मंत्री असताना तत्कालीन पालकमंत्री सुरेश शेट्टी यांच्याकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी केली होती. त्यानंतर मोदी यांचे सरकार आल्यावर केंद्र सरकारने देशात नवीन 75 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली होती. त्यामध्ये 9 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महाराष्ट्रासाठी होते. त्यामध्ये धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश होता. त्यानंतर धाराशिवचे वैद्यकीय महाविद्यालय हे आमदार राणाजगजितसिंह पाटील व आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या प्रयत्नामुळे तर तत्कालीन वैद्यकीय मंत्री गिरीष महाजन यांच्यामुळे झाले आहे असे सांगितले. परंतु विद्यमान खासदार महाविकास आघाडीच्या काळात आम्हीच धाराशिवचे वैद्यकीय महाविद्यालय आणले म्हणून सांगत आहेत. दुसऱ्यांनी केलेल्या विकास कामाचे श्रेय निष्यक्रीय खासदार घेत असल्याची टिकाही काळे यांनी केली. 


दिशाभूल करण्याचा प्रयत्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठचे उपकेंद्र धाराशिव येथे आहे. या उपकेंद्राचे पूर्ण विद्यापीठा रूपांतर करणार असल्याची घोषणा निष्यक्रीय खासदार यांनी करून एक समितीही नेमली होती. परंतु पुढे त्या समितीचे का झाले? त्या समितीची एकही बैठक झाली नाही. असे असताना विकासासंदर्भात खासदार दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना जनता चांगली ओळखून आहे असा टोला पण नितीन काळे यांनी लागवला. 


 
Top