भूम (प्रतिनिधी)-सोनारी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स कारखान्याने चालु गळीत हंगामात 4 लाख 90 हजार टन उसाचे यशस्वी गाळप केले. या गळीत हंगामाची सांगता शनिवार दि 23 रोजी  सखी धनंजय सावंत यांच्या हस्ते पूजन करून  सांगता करण्यात आली.

 भैरवनाथ कारखाण्याने वजनकाटा स्थळी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य शेती अधिकारी भगवान काळे, चीफ अकाउंटंट गोविंद कुलकर्णी, जनरल मॅनेजर प्रल्हाद ठोंबरे, प्रोडक्शन मॅनेजर राजेंद्र काळे, चीफ केमिस्ट्री दादा बोरकर, हेड टाईम कीपर सुरेश साळुंखे, बिसलरी मॅनेजर अजित भोसले, ज्येष्ठ अकाउंटंट बाळासाहेब धुमाळ, गोडाऊन कीपर श्रीकृष्ण झिरपे, सुपरवायझर अमोल कदम, केनयार्ड सुपरवायझर नीलकंठ बालगुडे, ऊस पुरवठा अधिकारी गणेश गरदडे, ऊस विकास अधिकारी अशोक हांगे, इन्स्ट्रुमेंट इंजिनियर सोमनाथ वाडेकर यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड मजूर, कारखान्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

कारखान्याच्या 16 व्या गळीत हंगामात 4 लाख 90 हजार टन ऊसाचे गाळप झाल्या असून 4 लाख 30 हजार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. कारखान्याने 20 जानेवारीपर्यंत 2725 दर दिला आहे. 21 जानेवारी ते 15 मार्च दरम्यान गाळप करण्यात आलेल्या ऊसाला 2800 रुपये दर तर, 15 मार्च ते कारखाना गाळप बंद होईपर्यंतच्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला 2925 रुपये दर देण्यात आलेला आहे. सभासदांसह सर्व घटकांच्या हितासाठी कारखाना प्रशासन कटिबध्द असल्याचे सखी धनंजय सावंत यांनी यप्रसंगी सांगितले.


 
Top