धाराशिव (प्रतिनिधी)-बोधिसत्त्व, विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ॲड. परवेज काझी यांची निवड करण्यात आली आहे. समितीचे मार्गदर्शक धनंजय शिंगाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. यावर्षीची मिरवणूक 20 एप्रिल रोजी काढण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले. यावेळी सर्वधर्मीय समाजबांधव उपस्थित होते.

समितीच्या वतीने मागील 30 वर्षापासून धाराशिव येथे विविध समाजोपयोगी कार्यक्रम घेऊन जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. यामध्ये सर्व जातीधर्मातील व्यक्तींचा समावेश असून दरवर्षी आगळ्यावेगळ्या पद्धतीने विशेषतः डॉल्बीमुक्त वातावरणात पारंपारिक वाद्यांच्या गजरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात येते. समितीचे मार्गदर्शक धनंजय शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली  रक्तदान शिबिर, रुग्णांना फळे वाटप यासह विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. जयंती उत्सव समितीच्या वतीने यावर्षी विविध राज्यांमधील पारंपारिक वाद्य समूहांना आमंत्रित करण्यात आलेले असल्यामुळे ही मिरवणूक वैशिष्टयपूर्ण ठरणार आहे. 

यावर्षीच्या जयंती समितीमध्येही सर्व जातीधर्मातील व्यक्तींचा समावेश करण्यात आलेला असून अध्यक्षपदी ॲड. परवेज काझी, कार्याध्यक्ष सतीश कदम, उपाध्यक्ष हरिश्चंद्र शिंदे, सतीश ओहाळ, सचिव कृष्णा भोसले, सहसचिव रवी कोरे, कोषाध्यक्ष विशाल शिंगाडे, सल्लागारपदी राजाभाऊ बागल, भाऊसाहेब उंबरे, नंदकुमार शेटे, सुभाष पवार यांची निवड करण्यात आली. तसेच मिरवणूक प्रमुखपदी रावसाहेब शिंगाडे, जैनुद्दीन मुजावर, सुरेश गवळी, सांस्कृतिक विभागप्रमुखपदी अभिजीत गिरी,इलियाज मुजावर,

 ईश्वर इंगळे, योगेश वाघमारे, सागर चव्हाण, बापू साबळे, विजय उंबरे, संरक्षण समिती प्रमुखपदी प्रसेनजित शिंगाडे, महेश शिंगाडे, समीर शेख, प्रसिद्धी प्रमुखपदी यशवंत शिंगाडे, धम्मपाल कांबळे, सारीपुत शिंगाडे, सत्यजित माने, अजय शिंगाडे यांची निवड घोषीत करण्यात आली. 


विविध राज्यांमधील पारंपारिक वादकांचा सहभाग

यंदाच्या जयंती उत्सवात मिरवणुकीमध्ये विविध राज्यांमधील पारंपारिक वादकांचा सहभाग असणार असल्यामुळे ही मिरवणूक वैशिष्टयपूर्ण ठरणार आहे. महाराष्ट्रातील ढोलीबाजासह हैदराबाद येथील मरफा या पारंपारिक वादकांचा सहभाग निश्चित झालेला आहे. आणखी इतर राज्यांमधील पारंपारिक वादकांचा देखील यामध्ये सहभाग होणार असल्याची माहिती समितीचे मार्गदर्शक धनंजय शिंगाडे यांनी यावेळी दिली.


 
Top