भूम (प्रतिनिधी)-बस स्थानकात मागील आठ दिवसापासून पाण्याच्या टाकी मागे पाईप फुटल्याने पाण्याच्या टाकीत पाणीच नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. 

भूम बस स्थानकात पाण्याची टाकी असून नळ कनेक्शन ही आहे. परंतु मागील आठ दिवसापासून पाण्याच्या टाकीमागील पाय फुटल्याने टाकीमध्ये पाणीच पडत नसून प्रवाशांना पाण्याची सोय होत नसल्याचे दिसून येत आहे. तापमान वाढत असून उन्हाचा पारा वरचढ होत असताना प्रवासी दररोज येजा करत असतात. ऐन उन्हाळ्यामध्ये भूम एसटी स्टँडमध्ये पाण्याच्या टाकीमध्ये पाणीच नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. या पाण्याच्या प्रश्नाकडे मात्र भूम आगाराचे अधिकारी लक्ष देत नसल्याचे पहावयास मिळत आहे.


 
Top