तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या तुळजापूर आगारातील बसचालक परमेश्वर आगलावे,वाहक बापूराव गुरव,वाहतूक नियंत्रक नंदकुमार वडवले यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने आगार प्रमुख रामचंद्र शिंदे यांच्याहस्ते सपत्नीक सन्मान सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी आगारातील आगार प्रमुख रामचंद्र शिंदे, लेखाधिकारी सुधीर बामनकर, सहायक वाहतूक निरीक्षक रमेश बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.तुळजापूर आगारातील सर्व कर्मचारी वर्ग, बालाजी गृपमधील सदस्यांसह आप्तेष्टांतर्फे निवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान सत्कार करत उर्वरित भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

बसचालक परमेश्वर आगलावे यांनी 29 वर्ष कर्तव्यसेवा,वाहक बापूराव गुरव यांनी 23 वर्ष कर्तव्यसेवा तर वाहतूक नियंत्रक नंदकुमार वडवले यांनी 37 वर्ष कर्तव्यसेवा पूर्ण केली आहे. याप्रसंगी मोहन साळुंखे,सुनील बोधले,चंद्रकांत नेपते,शहाजी रोचकरी,दत्ता तेलंग,किरण पाटील, दिपक सुरवसे,सागर सूर्यवंशी,महेंद्र नाईकवाडी, फुलचंद कांबळे आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.यावेळी आजी माजी कर्मचारी उपस्थित होते.


 
Top