धाराशिव (प्रतिनिधी)-संपूर्ण धाराशिव जिल्हा दुष्काळ जाहीर करुन शेतकरी, शेतमजूर व सुशेक्षित बेरोजगारांचे सर्व कर्ज माफ करावे, यासह इतर मागण्यासाठी राष्टवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बुधवारी (दि.13) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी जिल्हाधिकारी यांना रविवारी (दि.10) निवेदन देण्यात आले आहे.

खरीप 2023 मधील शेतकयाचे नगदी पीक सोयाबीन कमी पावसामुळे हातचे निघून गेले. 2023 मधील रब्बी हंगामातील हरभरा पीकाला एकरी एक क्विंटल उतार मिळाला, शेतीला पाणी नाही, विहीरीनी तळ गाठला आहे. शेतकरी, शेतमजूर व सुशिक्षीत बेकार युवक भयग्रस्त झालेला आहे. जिल्हाधिकारी यांना जिल्ह्यातील अडीअडचणी विषयी वेळोवेळी लेखी निवेदन देवूनही आजतागायत त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्या निषेधार्थ सामान्यांचा जनआक्रोष व्यक्त करण्यात येणार आहे. संपूर्ण जिल्हा तीव्र दुष्काळ जाहीर करुन दुष्काळी अनुदानाचे वाटप ताबडतोब करावे. शेतकरी, शेतमजूर व सुशेक्षति बेरोजगाराचे संपूर्ण कर्ज माफ करावे. गाईच्या दुधाला 40 तर म्हशीच्या दुधाला 70 रुपये लिटर प्रमाणे भाव देवून सरकारने घोषीत केलेले प्रती लिटर 5 रुपयचे अनुदान त्वरीत वाटप करावे. सन 2022 चा शिल्लक पीक विमा रक्कम त्वरीत वाटप करावी, सन 2023-2024 मधील पीक विमा आग्रीम रक्कम सर्व शेतकयांना त्वरीत वाटप करावी, सन 2023 चा संपूर्ण पीक विमा मिळावा अन्यथा पीक विमा कंपनीला काळ्या यादीत समाविष्ट करावे. जिल्ह्यातील नगर परिषद व ग्रामीण क्षेत्राातील पाणी नियोजन, रस्ते व स्वच्छतेचा बोजवारा उडालेला आहे. त्यावर तात्काळ कारवाई करुन पाणी, रस्ता व स्वच्छतेचे नियोजन तात्काळ करण्यात यावे. टेंभूर्णी लातूर चौपदरीकरणाचे काम त्वरीत चालु करण्यात यावे. मागील दोन वषार्पासून जिल्हा परिषद व पंचायत समितीला मिळणारे वित्त आयोगाचे 180 कोटी त्वरीत देण्यात यावे. शासनाकडून या मागण्याची दखल न घेतल्यामुळे जनआक्रोष व्यक्त करीत असल्याचे संजय पाटील दुधगावकर यांनी म्हंटले आहे.


 
Top