धाराशिव (प्रतिनिधी)-शासनाकडून दिव्यांग व्यक्तींना एसटी बस प्रवासाप्रमाणे रेल्वेतही सवलत दिली जाते. दिव्यांग व्यक्तींना सवलतीत प्रवास करता यावा, याकरिता प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन व शिवअर्पण दिव्यांग संघटनेच्या वतीने सोमवारी येथील शासकीय विश्रामगृहात मोफत येथे दिव्यांग रेल्वे पास नोंदणी शिबिर घेण्यात येणार आहे. धाराशिव तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी सकाळी 11 वाजता  आधार कार्ड झेरॉक्स चार सत्यप्रत व दिव्यांग प्रमाणपत्राच्या चार सत्यप्रत व चार रंगीत पासपोर्ट फोटो घेऊन येण्याचे आवाहन प्रहार दिव्यांग क्रांतीआंदोलनाचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांनी केले आहे.


 
Top