तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील माळुंब्रा येथे लोकप्रतिनिधी व ग्रामसेवकांचा दुर्लक्षा मुळे गावातील नालीचे सांडपाणी रस्त्यावरून वाहत असुन गावात अस्वछता  वाढल्यामुळे  रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने स्वछता बाबतीत संबधितांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर सोलापूर महामार्गा लगत 3800 लोकसंखेचे माळुंब्रा गाव असुन गावातील नाल्या बुजल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. तसेच ग्रामसेवकाचा दुर्लक्षाचा परिणाम ग्रामस्थांचे कामे आडुन होत आहे. गावास पाणीपुरवठा करणाऱ्या दोन विहरीला पाणी असताना गावाल चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. स्वछते बाबतीत बोबाबोंब आहे. घनकचरा व्यवस्थापन चा शासनाकडुन आलेला पैसा कुठे खर्च होतो. हा ग्रामस्थांना दिसुन येत नाही. हा पैसा कुठे खर्च झाला याची चौकशीची मागणी होत आहे. तरी गटविकासअधिकारी यांनी ग्रामस्थांच्या अडअचणी सोडवणारा ग्रामसेवक देण्याची मागणी केली जात आहे.


 
Top