तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यात यंदा कमी पडलेल्या पावसामुळे रबी हंगामातील ज्वारी पिक कमी आले असताना ज्वारीचे भाव गडगडल्याने शेतकऱ्यांना दुष्काळात तेरावा महिना आल्याचे दिसत आहे.

तुळजापूर तालुक्यात खरीप व रब्बी हंगामात अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात 34 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती. उपलब्ध पाण्यावर शेतकऱ्यांनी कसबसे  ज्वारीच्या पिक आणले सध्या ज्वारी व कडबा दर घसरले आहेत वीस रुपयेकडबा पेंढी असणारी ती आता 10ते 14रुपयावर आली आहे. तालुक्यात कमी पडलेला पावसामुळृ गहू पिकाची पेरणी कमी झाल्याने यावर्षी गव्हाचे पीक भाव खाणार आहे. तालुक्यात जनावरांची संख्या मोठी असून सध्या दुधाचे दर  खाली आल्याने जनावरांना पोसणे अवघड झाले आहे. तालुक्यात खरीप व रब्बी हंगामात भाव खाणार पिके घेतली नाहीत. अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. झाले आहे. पशुखाद्य, दर वाढले असताना दुध दर घसरत आहेत.  

शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. दोन महिन्यापूर्वी ज्वारीला 6500 रुपये इतका दर होता. आता तो निम्म्याने कमी आला आहे. सध्या ज्वारीचे

दर 2700ते 3200 रुपये इतके असून, कडबा वाढले असताना दुधाचे दर मात्र घसरत आहेत. चारा टंचाई जाणवू नये यासाठी शासनाने चारा पिकेनिर्मितीसाठी बियाणे दिले आहेत. तसेच कडब्याचाचारा देखील यावर्षी मोठ्या प्रमाणात आहे. तालुक्यात शेतीची कामे संपली असून ऊस कारखान्यांचे पट्टे पडल्यामुळे मजूर गावाकडे परतले आहेत. सध्या शेतीच्या पाण्याची बिकट अवस्था असून, विहीर, बोअर सार्वजनिक जलस्रोत यांनी तळ गाठला आहे. तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांची काढणी संपली असून ऊस गाळप हंगाम देखील संपत आला आहे. सध्या तालुक्यात पाणीटंचाई व मजुरांना रोजगाराची गरज असून, येत्या काही दिवसात जनावरांसाठी चारा डेपो सुरू करण्याची गरज निर्माण होणार आहे. पाणी साठ्यांनी मार्चच्या पहिल्याच आठवड्यात तळ गाठले आहेत.

पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.  उत्पादित माल हाती आल्यानंतर शेतकऱ्यांच्या पिकाला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. तालुक्यात यावर्षी अपुरा पाऊस झाल्याने रबी व ज्वारीचे क्षेत्र घटले. तालक्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर, जनावरांसाठी चारा डेपो व मजुरांसाठी रोजगार हमीची कामे सुरू करून आधार द्यावा. तसेच तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्यासाठी  उपसा सिंचन योजनेसाठी आणखी तातडीने निधी देऊन ही योजना मार्गी लावावी.अशी मागणी होत आहे.


 
Top