तुळजापूर (प्रतिनिधी) -मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर एसआयटी लावली हरकत नाही पण त्या अगोदर अंतरवली येथे लाठीमारचे आदेश  कुणी दिले यावर ही एसआयटी लावा असे आवाहन सताधारींना केले. शिवसेनेच्या नेत्या सुषमाताई अंधारे यांनी तुळजापूरात केले.

यावेळी बोलताना अंधारे पुढे  म्हणाल्या कि पौष महिन्यात देवधर्म वर्ज समजला जातो यांनी लोकसभा निवडणुकीत आपल्याला  फायदा व्हावा म्हणून चक्क प्रभुश्रीरामचंद्र ची प्रतिष्ठापना पौष महिन्यात केली हे यांचे हिंदूत्व असल्याची टीका  केली. मोदीची गँरटीचा खिरपूस समाचार घेताना अंधारे म्हणाल्या कि भष्ट्राचा-यांना उपमुखमंञी बनवणे ही मोदीची गँरटी आहे. आरक्षण शेतमालाला भाव महागाई भष्ट्राचार बेरोजगार हे ज्वलंत प्रश्नावर यांच्या कडे उत्तर  नाहीत म्हणून हे मते मागण्यासाठी  हिदुत्वाचा मागे लागल्याचा  आरोप केला. यावेळी  पुढे  बोलताना अंधारे म्हणाल्या की हसतखेळत घर मोडले आता यांच्यात  मारामा-या चालु आहेत सध्या स्थितीत भाजप सेना काडीमोड मार्गावर आहे. .एसबीआय सांगते विध्यार्थांना देण्यात येणाऱ्या  नोकऱ्यांच्या चलनातुन अधिक पैसे येतायत म्हणजे हे सरकार बेरोजगाराना अर्थिक उत्पनाचे साधन बनविल्याचा आरोप केला. आनंदाचा शिधात किडकी दाळ देतायत आनंदाचा शिधा खराच द्यायचा असेल तर गँस सह द्या  तो खरा आनंदाचा शिधा ठरेल असे यावेळी म्हणाल्या. ईडी लागलेल्या ऐकालाही शिक्षा नाही आम्हाला बीडी माहीती होती पण ईडी माहीती नव्हती असे यावेळी स्पष्ट केले.


 
Top