धाराशिव (प्रतिनिधी)- पुरातत्वज्ञ व इतिहासकार युवराज नळे, इतिहासकार डॉ सतिश कदम यांच्या साहित्य क्षेत्रातील कार्याची दखल शासनाने घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्र साधने प्रकाशन समिती वर निमंत्रित सदस्य पदी निवड व जिल्हा सरकारी अभियोक्ता पदी महेंद्र देशमुख यांची निवड झाल्याबद्दल पर्यटन जनजागृती संस्था धाराशिव संचलित पर्यटन विकास समितीच्या वतीने संजीवन हॉस्पिटल येथे सत्कार करण्यात आला. शाल पुष्पहार,पुष्प बुके देऊन व पेढे भरवुन सत्कार करण्यात आला.

डॉ. अभय शहापुरकर यांनी तिन्ही सत्कार मुर्तींना शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याची माहिती दिली. सत्कार केल्याबद्दल सत्कार मुर्तींनी समितीचे आभार मानले. सरकारी अभियोक्ता महेंद्र देशमुख यांनी न्यायालयातील अनुभव व्यक्त केले. तर इतिहासकार डॉ सतिश कदम यांनी निजामकालीन इतिहास सांगत शेवटचे कलेक्टर हैदर यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. तर आम्ही संशोधक केवळ सत्य ते जगासमोर मांडतो. जात धर्म याला थारा देत नाहीत. समितीचे अध्यक्ष युवराज नळे यांनी पर्यटन विकास समितीच्या कार्याची माहिती दिली. राणा दादा पाटील यांच्या विकासात्मक धोरणात धाराशिवचे पर्यटन विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे व भविष्यात धाराशिव जिल्ह्यातील पुरातत्वीय व पर्यटन स्थळे जागतिक स्तरावर ओळखले जातील असे मनोगत व्यक्त केले. अब्दुल लतिफ यांनी म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यात मुस्लिम समाज बांधव होते. परंतु त्यांच्या नावासह त्यांचा इतिहास समोर यायला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी समितीचे अध्यक्ष युवराज नळे, मार्गदर्शक डॉ अभय शहापुरकर, मार्गदर्शक प्रा.अभिमान हंगरगेकर, सहसचिव अब्दुल लतिफ अब्दुल मजीद,सदस्य राजेंद्र धावारे, डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार प्राप्त तथा समिती सदस्य विजय गायकवाड, उपाध्यक्ष गणेश वाघमारे,  कोषाध्यक्ष बाबासाहेब गुळीग,राजाभाऊ कारंडे, प्रदिप पांढरे, बापु बनसोडे, महेशराव सह पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गणेश वाघमारे तर आभार विजय गायकवाड यांनी मानले.


 
Top