भूम (प्रतिनिधी)-भूम येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ संजय शाळू यांची भारत सरकार नोटरी म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा भारतीय जनता पार्टीच्यावतीने सन्मान करण्यात आला.

शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 रोजी भूम येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातील ज्येष्ठ विविज्ञ संजय शाळू यांची भारत सरकार नोटरी म्हणून निवड झाल्याची माहिती कळताच त्यांचा भाजप पक्ष पदाधिकाऱ्यांनी येथेच्छ सन्मान केला. गेले अनेक कालावधीपासून ते नोटरी म्हणून काम करण्याची संधी मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नाला मोदी सरकारच्या काळात संधी मिळाली म्हणून विधीज्ञ संजय  शाळु यांनी देखील सत्कार दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष हेमंत देशमुख, भूम शहराध्यक्ष बाबासाहेब वीर, तालुका प्रसिध्दी प्रमुख शंकर खामकर, प्रदिप साठे, जयवंतनगरचे उपसरपंच बापू नागरगोजे, ॲड. पी. पी. मोटे, सरचिटणीस लक्ष्मण भोरे, शिवाजी उगलमुगले,  सचिन साठे उपस्थित होते.


 
Top