सोलापूर (प्रतिनिधी)-पुणे ते अमरावती दरम्यान नवीन द्वि-साप्ताहिक गाड़ी चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.  

तपशील खालीलप्रमाणे आहे - गाडी क्रमांक 11405 पुणे-अमरावती द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेस दिनांक  10.03.2024 पासून दर शुक्रवारी आणि सोमवारी पुण्याहून 22.45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 17.30 वाजता अमरावतीला पोहोचेल. गाडी क्रमांक 11406 अमरावती - पुणे द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेस अमरावती येथून दिनांक 09.03.2024 पासून दर शनिवारी आणि सोमवारी 19.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 16.25 वाजता पुण्याला पोहोचेल.

थांबे: उरुळी, केडगाव, दौंड जंक्शन, जिंती रोड, जेऊर, कुर्डुवाडी, बार्शी टाउन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, परभणी, पूर्णा, वसमत, हिंगोली डेक्कन, वाशीम, अकोला, मूर्तिजापूर आणि बडनेरा. कोच रचना: एकूण 17  कोच:- एक  फर्स्ट एसी, एक -2 टियर,  दोन -3 टियर, 5 स्लीपर क्लास, 8 जनरल सेकंड क्लाससह लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन. आरक्षण: या गाडी करीता बुकिंग दिनांक  09.03.2024 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू होईल. या गाडीच्या थांबण्याच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry. indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. प्रवाशांनी कृपया या सुविधेचा लाभ घ्यावा.


 
Top