धाराशिव (प्रतिनिधी)-संत साहित्याचे अभ्यासक व ज्येष्ठ साहित्यिक, धाराशिव जिल्हयाचे भुमीपुत्र डॉ. मुरहरी केळे यांच्या 'एडका' आत्मचरित्राचे प्रकाशन छत्रपती संभाजीनगरच्या तापडिया नाट्य मंदिरात रविवारी (ता. दहा) सायंकाळी 4 वाजता होणार आहे.

90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन होईल. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी अध्यक्षस्थानी राहतील. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस व डॉ. यशपाल भिंगे हे ग्रंथावर भाष्य करणार आहेत. ग्रंथाचे लेखक तथा महावितरणचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांची प्रमुख उपस्थिती राहील. या कार्यक्रमास साहित्यरसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्कृती प्रकाशनच्या मनिषा केळे व अन्वी पब्लिकेशन्सच्या डॉ. कविता मुरूमकर यांनी केले आहे.


 
Top