तुळजापूर (प्रतिनिधी)-  येथील निजाम कालीन नऊ मुतारी चोरीला गेल्या असुन, त्याची चौकशी करुन संबंधीतावर कायदेशीर कार्यवाही करुन निजाम काळातील जुन्या नऊ मुतारी चालु करण्याची मागणी अमोल जाधव, शाम पवार यांनी मुख्याधिकारी प्रियंवदा  म्हाडदाळकर यांना निवेदन देवुन केली. निजाम कालीन या स्वच्छतागृहावर अतिक्रमण करून जागा गायब केली आहे.  

तिर्थक्षेञ तुळजापूर हे 1948 साली निजाम राजवटीतुन मराठवाडा मुक्त झाला. या मराठवाड्यातील महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या पावन नगरीत निजाम राजवटीमध्ये तुळजापूर शहरात ऐतिहासिक नऊ मुताऱ्या एस. टी. स्टँड, आंबेडकर चौक, प्रताप टॉकीज, जवाहर गल्ली, भवानी रोड, शुक्रवार पेठ, आर्य चौक, साळुंके गल्ली, कमानवेस, पुर्व मंगळवार पेठ अशा ठिकाणी बांधण्यात आल्या होत्या. परंतु गेली दहा ते बारा वर्षात त्या मुताऱ्या चोरीस गेल्या आहेत.

तरी मे. साहेबांनी याबाबत तात्काळ चौकशी करुन व अभिलेखाची पाहणी, चौरी गेलेल्या निजाम काळातील नऊ मुतारी चालु करुन संबंधीतावर योग्यती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अन्यथा नाईलाजास्तरव तुळजापूर तालुका व शिवसेनेच्या वतीने अंदोलन छेडले जाईल. होणाऱ्या परिणामास व्यक्तीशा आपण स्वत: जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. तिर्थक्षेञ तुळजापूर येथे पुर्वी मोठ्या संखेने स्वछतागृह, शौचालय होते. त्या आता नाहीशा झाल्या आहेत. याचीही चौकशी होणे गरजेच आहे. हे निवेदन  शिवसेनेवतीने शाम पवार, अमोल जाधव यांनी दिले.


 
Top