धाराशिव (प्रतिनिधी)- मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे मानधन त्वरित वितरित करण्याची मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची जिल्हाधिकारी त्यांच्याकडे केली आहे.

संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या निर्देशा नुसार व राज्य मागासवर्ग आयोगाच्या नियंत्रणाखाली मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी, मराठा समाजाच्या आर्थिक व सामाजिक  सद्यस्थितीचे सर्वेक्षण विहित कालावधीत पूर्ण केलेले आहे. हे सर्वेक्षण वेळेत पूर्ण करणारे प्रगणक आणि पर्यवेक्षक यांना अद्याप पर्यंत कसलेही मानधन देण्यात आलेली नाही.  तरी मराठा सर्वेक्षणाचे मानधन प्रगणक व पर्यवेक्षक यांना लवकरात लवकर देण्यात यावे असे निवेदन अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना दिले आहे. निवेदनावर राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर, राज्य नेते बशीरभाई तांबोळी, राज्य महिला प्रतिनिधी सविताताई पांढरे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, जिल्हा सरचिटणीस अविनाश मोकाशे, राजाभाऊ आकोसकर यांच्या स्वाक्षरी आहेत.


 
Top