धाराशिव (प्रतिनिधी)- शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवची एक विशेष बैठक स्वयंवर मंगल कार्यालय जिजाऊ चौक बार्शी नाका धाराशिव येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये सन 2024 या वर्षाकरिता समितीचे नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. 

यामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे जिल्हाध्यक्षपदी गौरव अशोकराव बागल यांची सर्व संमतीने व बहुमताने निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी आकाश मिलिंदराव कोकाटे यांची एकमताने निवड करण्यात आली. समितीचे सचिवपदी अमोल सुभाषराव पवार यांची सर्व संमतीने निवड करण्यात आली. तसेच धाराशिव शहराध्यक्षपदी समितीचे मंगेश निंबाळकर यांची बहुमताने निवड करण्यात आली. शहर उपाध्यक्षपदी आकाश भोसले यांची तर शहर सचिव म्हणून शुभम लोकरे यांची निवड करण्यात आली. यावेळी सर्व निवड झालेल्या पदाधिकारी यांचे फेटा शाल श्रीफळ व पुष्पहार घालून तसेच फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये सर्वांची अभिनंदनीय अशी निवड करण्यात आली. या सर्व निवडी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे मावळते अध्यक्ष धर्मराज अण्णासाहेब सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी समितीचे माजी अध्यक्ष शशिकांत खुने, तालुकाध्यक्ष अमोल सिरसट, रिक्षा समिती अध्यक्ष मनोज जाधव, तालुका उपाध्यक्ष व्यंकट कोळी, अच्युत थोरात, मेजर सुदर्शन बुकन, हनुमंत यादव, सुनील मिसाळ, संतोष घोरपडे, भैरवनाथ रणखांब, धनंजय साळुंखे, दादा कदम, योगेश आतकरे, रमेश यादव, अजय डोंगे, मनोज मोरे, बालाजी पवार यांचे सह बहुसंख्य समितीचे सहकारी हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर मते यांनी केले. तर आभार प्रदर्शन शशिकांत खुणे यांनी केले. कार्यक्रम अतिशय उत्साहात व आनंदात पार पडला.


 
Top