धाराशिव (प्रतिनिधी)-सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला आशेचा किरण दाखवला आहे. परंतु गद्दार मंडळाचे वकील नवीन मुद्दे पुढे आणून वेळ काढूपणा करीत आहेत. आम्ही बनावट कागदपत्र दाखल केले. असा आरोप करण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे बनावट होते का? आमची शिवसेना बनावट आहे का? असा प्रश्न शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला. 

गेल्या दोन दिवसापासून माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, खासदार संजय राऊत धाराशिव जिल्ह्यात आहेत. शुक्रवार दि. 8 मार्च रोजी सकाळी खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत घेतली. पत्रकार परिषदेत बोलताना खासदार राऊत यांनी उध्दव ठाकरे यांच्या जनसंवाद दौऱ्यास कालपासून लातूरहून सुरूवात झाली आहे. लोकांनी रस्त्यावर उतरून नियोजित ठिकाण नसताना अनेक ठिकाणी लोकांनी स्वागत केले. शिवसेनेच्या पाठीशी पदाधिकारी आणि लोक मोठ्या संख्येने उभे आहेत. परंतु गद्दार आमिषाला बळी पडून पळून गेले आहेत. मात्र जनता पाठीशी असल्याचे दिसून आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या दिशानुसार नेमलेल्या लवादाने काम केले नसल्याने सरन्यायाधीश यांनी सांगितले. 



मराठा समाजाने ताफा अडविला



उध्दव ठाकरे यांना महाविकास आघाडीचे पदाधिकारी हॉटेल पुष्पकवर आले होते. यावेळी त्यांची एक बैठकही झाली. त्यानंतर उध्दव ठाकरे यांचा ताफा सकाळी 11 वाजता कळंबकडे जाहीर सभेकडे जात असताना धाराशिव शहरातील नाईकवाडी नगर येथे ठाकरे यांचा ताफा सकल मराठा समाजाने अडविला. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी उध्दव ठाकरे यांनी आपण तुमच्या सोबत आहोत असे सांगितल्यानंतर सकल समाजाच्यावतीने ठाकरे यांना एक निवेदन देण्यात आले. त्यानंतर ठाकरे यांचा ताफा कळंबकडे रवाना झाला.


 
Top