धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे  कार्यतत्पर जिल्हाध्यक्ष महेंद्र  धुरगुडे यांची जिल्हा नियोजन समिती धाराशिवच्या विशेष निमंत्रित सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल धनंजय कुलकर्णी, मनोहर क्षीरसागर, कोल्हाळ धनराज, बाळासाहेब माने, बद्रीनाथ कोळपे, लक्ष्मण झिरमिरे, दत्तात्रय सुरवसे सांगवी ग्रामस्थ यांच्या वतीने   पक्ष कार्यालय धाराशिव येथे सत्कार करण्यात आला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यतत्पर जिल्हाध्यक्ष मा.महेंद्र काका धुरगुडे यांच्या हस्ते आणि जिल्हा कार्याध्यक्ष समियोद्दीन मशायक, धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय धाराशिव येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी धाराशिव तालुक्यातील चिलवडी जिल्हा परिषद गटप्रमुख  पदी संगीता विष्णू ढोकळे व धाराशिव महिला अल्पसंख्यांक शहर कार्याध्यक्षपदी अमिना रियाज शेख यांची नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी महिला जिल्हा कार्याध्यक्ष अप्सरा पठाण, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, धाराशिव अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अरफात काझी,आंबेजवळगा जि प गटप्रमुख सुरेश राठोड, केशेगाव जि.प. गटप्रमुख लिंबराज लोखंडे, सामाजिक न्याय जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ जानराव, धाराशिव महिला तालुका उपाध्यक्ष उषा लगाडे,लता ढोकळे, उषा सोनवणे, संगीता सरवदे ,वैशाली साबळे, सुलभा धर्मे,मनीषा संकपाळ, शोभा सोनवणे  आदी पदाधिकारी कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते.


 
Top