तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील नगरपरिषद मध्ये सोळा पैकी अवघा सहा जागेवर कायम अधिकारी कर्मचारी असुन उर्वरीत जागेवर कंञाटी अधिकारी असल्याने या नगरपरिषदचा कारभार कंञाटी अधिकारी चालवत असल्याने कामात सुसुञता  दिसुन यात नाही. यामुळे  याचा परिणाम नागरिकांचे कामे वेळेवर होत नाहीत व विकास कामे निकृष्ट दर्जाचे होत आहेत. तर काही रखडत आहेत.

नगरपरिषद मध्ये संवर्गातील 16पदे असुन त्यापैकी सहा पदावर अधिकारी असून उर्वरीत दहा पदे रिक्त आहेत. त्यात लेखापाल टिकत नाही अंतर्गत लेखापाल संगणक अभियंता विद्युत अभियंता स्वछता निरक्षक अग्नी शमन अधिकारी कर निर्धारण मधील दोन पदे असे रिक्त आहेत. सध्या तुळजापूर नगरपरिषद च्या पदावर वर्षानु वर्ष कंञाटी मंडळी असुन यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने कमी पगारी  फुल्ल अधिकारी झाले. असुन लाखो रुपयांचे बिल ही  मंडळी बिनबोभाट काढत आहेत. ज्या फाईल मधुन मलिदा मिळतो त्या फाईल अदृश्य शक्ती माध्यमातून स्वताकडे घेवुन त्यांचे बिले काढले जात आहे. काही कंञाटी हे स्वताच्या संस्थेला कामे देवुन मस्तपैकी कारभार करीत आहेत. हे प्रभारी मुख्याधिकारी असल्याने बिनबोभाट चालु आहे. कंञाटी अधिकारी नगरपरिषद मध्ये अधिकारी बनल्याचे दिसुन येत आहे.


 
Top