तुळजापूर - तामलवाडी येथिल सरस्वती विद्यालय येथे व गोधळवाडी येथिल जिल्हापरिषद शाळेत बालाजी अमाईन्सच्या वतीने सीएसआर अंर्तगत सॅनेटरी पॅड वेडिंग मशिन बसविण्यात आली आहे.

डिसेंबर महिन्यात बालाजी अमाईन्सच्यावतीने तामलवाडी येथिल सरस्वती विदयालय येथे दोन वर्ग खोल्या व गोधळवाडी येथिल जिल्हापरिषद शाळेत एक वर्ग खोलीचे उदघाटन करते वेळी सरस्वती विदयालय तामलवाडी शाळेत मुलींची संख्या 435 इतकी असल्याने मुलींना त्या दिवसाच्या अडचणीत त्यांना शाळेत सॅनेटरी पॅड उपलब्ध व्हावेत. या करीता बालाजी अमाईन्सचे  व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांनी दोन्ही शाळेत सॅनेटरी पॅड वेडिंग मशिन व इनसिनेटर मशीन बसऊन देण्याचे शाळेत शिक्षिका व विदयार्थीनींना मार्गदर्शन करताना सागितले होते. दि. 29.02.2024 रोजी सकाळी बालाजी अमाईन्सचे मारूती सावंत यांच्या हस्ते सरस्वती विदयालय तामलवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोधळवाडी या शाळांना सॅनेटरी पॅड वेडींग मशीन व इनसिनेटर मशीन देण्यात आली. या कार्यक्रमात बालाजी अमाईन्सचे मारुती सावंत यांचे हस्ते मशीन मुख्याध्यापक यांचे कडे देण्यात आली. सरस्वती विदयालयाचे मुख्याध्यापक सुहास वडणे यांनी सरस्वती विदयालयास आजुबाजुच्या गावातून विदयार्थीनी या शाळेत जास्त प्रमाणात येताता शाळेस अश्या मशीनची गरज होती.व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांनी वेडींग मशीन व इनसिनेटर मशीन एका महीन्या उपलब्ध करून दिल्याबददल सर्व संचालक व राम रेडडी व राजेश्वर रेडडी  यांचे आभार मानले. गोधळवाडी शाळेचे श्रीमती सावंत मॅडम, गीरे मॅडम  पीरजादे मॅडम, श्रीमती वटणे मॅडम, गोधळवाडी मुख्याध्यापक पिंपळेसर, तोटवाड, शाळेतील शिक्षक व विदयार्थीनी उपस्थित होत्या.


 
Top