तुळजापूर (प्रतिनिधी)- आगामी काळात भाविकांची संख्या वाढणार असल्याने  पिण्याच्या  पाण्याचे नियोजन करावे व नगरपरिषद शाळा क्रमांक एक व दोन कडे  विशेष बाब म्हणुन लक्ष द्यावे. अशी मागणी  शेतकरी कामगार पक्ष, शाखा तुळजापूरने  मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदन देवुन केली.

तुळजापूर हे तिर्थ क्षेत्रअसल्यामुळे पाणीपुरवठा  तीन दिवसा आड  करायचा असेल तर पाणी पुरविण्याचा वेळ (टायमिंग) वाढवावी  व शहरात सर्व विभागात सम प्रमाणात पाणी पुरवठा व्हावा. काही विभागात पाणी जास्त सोडले जाते. तिचे सुध्दा पाणी रस्त्यावर वाया जाते. तरी आपण स्वतः लक्ष द्यावे. गावातील आपल्या प्राथमिक शाळ क्रमांक एक व दोन या शाळांची प्रचंड दुरावस्था झाल्याने  त्याकडे आपण विशेष शैक्षणीक भाग म्हणुन आपण लक्ष दिले तर शाळा

नगर परिषद दर्जा सुधारुन  गरीब विद्यार्थ्यांना  चांगल्या दर्जदार शिक्षण मिळाले. यावर आपण विचार करावा अशा आशयाचे निवेदन शेकापचे उत्तम अमृतराव, बालासाहेब कुतवळ, दिपक सुरवसे, किरण खपले, मारुती नाईकवाडी,भारत कदम, बाबासाहेब शेळके, युसुफ भाई शेख, सुधीर जमादार यांनी दिले.


 
Top