धाराशिव (प्रतिनिधी)-वित्तीय वर्ष सन 2023-2024 या वर्षाच्या रक्कमांचे सर्व व्यवहार 31 मार्च 2024 रोजी पूर्ण करणे आवश्यक आहेत. त्यामुळे जिल्हयातील सर्व शासकीय कार्यालये आणि नागरीकांना शासकीय रक्कमांचा बँकेत भरणा करण्यासाठी तसेच बँकेतून रक्कमा काढण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे आवश्यक आहे.

त्यामुळे जिल्हयातील शासकीय रक्कमेचा देवाण-घेवाणीचा व्यवहार करणा-या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखा तसेच सर्व राष्ट्रीयकृत बँका रविवार  31 मार्च - 2024 रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिले आहे.


 
Top