कळंब (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील जिल्हापरिषद शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवले जातील अशी ग्वाही धाराशिव जिल्हा परिषदचे नुतन मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास दिली. असल्याची माहिती प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदचे नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी व नुतन प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांचा सत्कार करुन मागण्याचे निवेदन सादर केले.

त्यांना दिलेल्या निवेदनात  केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांची रिक्त पदे भरावीत, प्रलंबित वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीचे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढावेत, वैद्यकीय परिपुर्तीचे प्रस्ताव निकाली काढुन देयके पारित करावीत,प्राथमिक पदवीधर शिक्षकांच्या पदावनत चे प्रस्ताव मान्य करावेत, जिल्हाबदलून आलेल्या शिक्षकांना जादावेतनवाढ द्यावी,जिल्हास्तरीय प्रलंबित  शिक्षक पुरस्काराचे  वितरित करावे, शिक्षकांच्या मुळ व,दुय्यम सेवा पुस्तिका अद्यावत करण्यासाठी तालुकास्तरावर कँप लावावेत. भविष्य निर्वाह निधीचे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढावेत, जिल्हापरिषद प्रशालेतील मुख्याध्यापकांची रिक्त पदे भरावीत अशासकीय कपातीचे धनादेश गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्फत मिळावेत या मागण्या करण्यात आल्या आहेत.

निवेदनातील सर्वच प्रश्नाबाबत संचिका सादर करण्याचे आदेश मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी संबंधितास दिले आहेत. तर केंद्रप्रमुख पदोन्नतीची प्रक्रिया दोन दिवसात पुर्ण करण्याबाबत सुचित केले. या प्रसंगी मुख्यकार्यकारी अधिकारी  डॉ.मैनक घोष व शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांचा शिक्षक संघाच्या वतीने शाल, बुके व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

या शिष्टमंडळात शिक्षक महासंघाचे  राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्यासह जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे ,कोषाध्यक्ष सुधीर वाघमारे, जिल्हा नेते धनंजय मुळे, जिल्हा शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष शेषेराव उपाध्यक्ष अनिल हंगरकर, प्रवक्ता उमेश भोसले, संपर्क प्रमुख बालाजी पडवळ, अध्यक्ष धाराशिव राहुल भंडारे, अध्यक्ष कळंब दत्तात्रय पवार,अध्यक्ष तुळजापूर सचिन राऊत, कार्याध्यक्ष प्रशांत घुटे,सरचिटणीस ,विक्रम लोमटे, नितिन ढगे, बापु काळे, अरुण खराडे, दयानंद सुरवसे, श्रीकांत गरड, अशोक वाघमारे, सुधाकर कावळे यांच्यासह पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. बैठकीचे प्रस्तावित संतोष देशपांडे व आभार सुधीर वाघमारे यांनी मानले.


 
Top