तुळजापूर (प्रतिनिधी) - येथील  एसटी आगारातील  चालक सतीश कमलाकर भांजी हे  सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करुन त्यांना शुक्रवार दि.1 मार्च रोजी  निरोप देण्यात आला.या वेळी  त्यांचा त्यांच्या सौभाग्यवती, मातापिता यांचा आगार प्रमुख श्रीराम शिंदे यांच्या सत्कार करण्यात आला.

या  प्रसंगी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माधवराव कुतवळ, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, तुळजापूर नगरीचे माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे व तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर  गंगणे, माजी नगरसेवक भाऊसाहेब भांजी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सतीश भांजे यांनी तुळजापूर आगार येथे चालक म्हणून विना एक्सीडेंट नो टच 27 वर्ष सुरक्षित सर्विस पार पडली व ते  1 मार्च 2024 रोजी निवृत्त होत आहेत. म्हणून त्यांचा भव्य सत्कार करण्यात येत आहे. या सत्कार समारंभामध्ये सतीश भांजी यांचा सत्कार जवाहर तरुण मंडळ व मित्र कंपनी विविध पक्षाचे नेते राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते व यांच्यावतीने पण सत्कार करण्यात आला.

या सत्कार समारंभ प्रसंगी सत्कार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी, ज्येष्ठ नेते दिलीप मगर, शेतकरी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष रविद्र इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मीडिया प्रमुख बबनराव गावडे, खंडोजी जाधव, भारतीय जनता पार्टीचे सुहास साळुंखे, राजेंद्र कदम, एन, डी, शिंदे, दत्ता धुमाळ, नंदू मगर, राजेश शिंदे, भालचंद्र मगर, राजेश शिंदे, अण्णासाहेब मगर, युवराज मगर, हेमंत कांबळे, श्रीकांत धुमाळ, कुमार इंगळे, युसुफ शेख, राजाभाऊ साळुंखे, आकाश पवार, मोहन चौगुले, चेतन गायकवाड, संजय शिंदे, सोमनाथ भांजी, राहुल भांजी, अनिल भांजी, संभाजी भाजी, अनिल भांजी महेश भांजी अदि मान्यवर उपस्थितीत होते.  या सर्व मान्यवरांनी सतीश भांजी यांचा भव्य सत्कार केला व त्यांना पुढील दीर्घायुष्य लाभावे यासाठी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना केली या समय महिला मंडळ व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते तुळजापूर एसटी आगाराचे श्रीराम शिंदे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव कुतवळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.


 
Top