धाराशिव (प्रतिनिधी)-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत, प्लास्टिक मुक्त भारत अभियान नुकतेच येथील तेरणा अभियांत्रिक महाविद्यालयात राबविण्यात आले.

अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागाच्या मेसा स्टुडन्ट असोसिएशनच्या वतीने हे अभियान राबविण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ.विक्रमसिंह माने , मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख आणि अकॅडमिक डीन डॉ. डी. डी. दाते, प्रा.ए. बी. घळके, प्रा. ए. झेड. पटेल, प्रा.पी. एच. जैन, प्रा. डी. एच. निंबाळकर, प्रा. ए. बी. भस्मे, प्रा. यु. जे. जाधव, प्रा.एस.पी. बिरादार,  प्रा.आर. एम. शेख, प्रा. आर. डी. गुरव, प्रा. व्ही. डी. जगदाळे, प्रा. एम. व्ही. जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की , प्लास्टिक वापरताना आपण ते सहज वापरतो पण याचे दुष्परिणाम अत्यंत भीषण असून आपण वेळीच हे दुष्परिणाम ओळखले पाहिजेत.  जिथे शक्य आहे तिथे प्लास्टिक न वापरता साध्या कापडी पिशव्या वापरून आपण प्लास्टिक मुक्त भारतीय अभियानाला सहकार्य केले पाहिजे.

यावेळी बोलताना डॉ.डी डी दाते म्हणाले की ,प्लास्टिक हे फक्त पिशव्याच्या स्वरूपात नसून आपण विविध स्वरूपात हे प्लास्टिक वापरत असून दैनंदिन आपल्या व्यवहारांमध्ये प्रचंड प्रमाणात प्लास्टिक आहे. आपण जेवताना सुद्धा विविध प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर करत असतो. गरम खाद्य पदार्थ आणि प्लास्टिकचा संपर्क अत्यंत घातक असून त्याचे दुष्परिणाम शरीरावर सुद्धा दिसून येत आहेत , कॅन्सर सारखे आजार सुद्धा प्लास्टिक मुळे होतात असं संशोधनाने सिद्ध होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधनांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावावी अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी अभियांत्रिक महाविद्यालयाच्या भव्य परिसरातील संपूर्ण प्लास्टिक गोळा करून विद्यार्थ्यांनी या अभियानात प्रत्यक्ष सहभाग नोंदविला यावेळी विद्यार्थ्यांना जयसिंग ठाकूर आणि किरण बोधले या कर्मचाऱ्यांनी प्लास्टिक गोळा करण्यासाठी सहकार्य केले.


 
Top