भूम (प्रतिनिधी)- दुनिया झुकती है मगर झुकानेवाला चाहिये. यानुसार भूम तालुक्यातील ईट  येथील पाव विक्रेत्याचा मुलगा अरबाज वहाब पठाण विक्रीकर निरीक्षक झाला आहे. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी अरबाज वहाब पठाण या मुलाने अभ्यास करून जिद्द व चिकाटीच्या जोरावर विक्रीकर निरीक्षकाची परीक्षा पास होऊन महाराष्ट्रात 76 वा येण्याचा मान मिळवला आहे. 

अरबाजची घरची परिस्थिती तशी बेताचीच. वडिल ईट येथे बेकरी चालवतात व  मागील 35 ते 40 वर्षापासून सायकली वरून आसपासच्या खेड्यात पाव विक्रीचे काम करतात. त्यांचा मुलगा विक्रीकर निरीक्षक झाल्याचे कळतात त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू  आले. अरबाज याचे दहावीपर्यंतचे शिक्षण ईट येथील जीप शाळेत झाले आहे. सध्या तो 22 मार्चपासून रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात तलाठी या पदावर कार्यरत आहे. तलाठी परीक्षेत ही तो रायगड जिल्ह्यातून सातव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. अरबाजने  या यशाचे श्रेय त्याचे आई वडील व दोन भाऊ यांना दिले आहे. 


 
Top