तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील बारालिंग मंदिर परिसरात आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात जगतगुरु संत तुकाराम महाराज बीज निमित्त बुधवार दि. 27 मार्च  रोजी जगतगुरु संत तुकाराम यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. तुकाराम बीज निमित्ताने  हभप अशोक महाराज यादव यांचे गुलालाचे किर्तन संपन्न झाला. यात त्यांना जगदगुरु संत  तुकाराम महाराजांची जीवनगाथेवर किर्तन केले. या सप्ताह सोहळ्याचे आयोजन पांडुरंग महिला भजनी मंडळ व बारालिंग मित्र मंडळ तुळजापूर यांच्या वतीने करण्यात आले होते.


 
Top