भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यात सदैव गोर गरीब व वंचीताना मदत करणारे त्यांच्या माध्यमातून  कपडा बँक विट भट्टी कामगार, जत्रेतील फिरस्ती पाळणेवाले, पालावरील लोक ऊस तोड कामगार, डोंबाऱ्याचा खेळ,  करणारे तसेच बहुरुपी  यांना एक  ते दिड लाख कपड्यांच त्यांनी वाटप,केले कोरोना काळात गरजवंतापर्यंत सकाळचे शिवभोजन आणि सायंकाळचे श्री भोजन मिळून जवळपास दोन लाख डब्यांचे मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने केलेले वाटप,कोरोना काळात ग्रामीण रुग्णालय भूम येथे लोकसहभागातून 5 oxygen concentrator  मशिन आणि 3 बायपॅप मशिन (मिनी व्हेंटिलेटर असो ) किंवा दिपावली मध्ये गरीब आणि गरजवंत लोकांना दरवर्षी फराळ वाटप* असो,10गरीब आणि गरजवंत मुलींच्या लग्नासाठी संसारोपयोगी साहित्य वाटप,  परगावावरून  शिक्षणासाठी पायी ये जा करणाऱ्या गरीब आणि गरजवंत मुलींना सायकल  वाटप, रेनकोट वाटप, असो, रणवीर सावंत याच्या  डोळयावरील ऑपेरेशन साठी 2 लाख 45 हजार रुपये (लोकसहभागातून) जमा करणे इत्यादी अनेक कामे त्यांनी केली आहेत. तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त भारताचे संविधान फोटो बऱ्याच शाळांना भेट दिलेले कार्य तसेच सरांच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध शाळांना आणि विद्यार्थ्यांना गणित शॉर्ट कट संग्रह वाटप असे उल्लेखनीय कार्य सामाजिक कार्याची दखल  घेऊन संदीप बागडे सर यांना  संजीवनी फॉउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2024 देऊन संगमनेर येथे गौरविण्यात आले. त्यांनी केलेल्या सामाजिक व संवेदनशील कार्यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळाल्याने भूम तालुक्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


 
Top