भूम (प्रतिनिधी)-मुंबई महानगरपालिकेत (वर्ग-2) अधिकारी पदी भुम तालुक्यातील भोगलगाव सारख्या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची अतिशय खडतर परिश्रमातून निवड झाली आहे. त्याबद्दल प्रशालेच्या वतीने सुयोग खुळेचा सत्कार करण्यात आला. 

या सत्कार समारंभाला संस्थेचे सचिव आर. डी. सुळ, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाडे, उपमुख्याध्यापिका शर्मिला पाटील, पर्यवेक्षक मिलिंद लगाडे, धनंजय पवार, भागवत लोकरे, रविंद्र प्राथमिकचे मुख्याध्यापक लक्ष्मण देशमुख तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top