परंडा (प्रतिनिधी) - येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव अंतर्गत शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालय परंडा येथे प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्रा. प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणी शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अतुल हुंबे व डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

यावेळी वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रकाश सरवदे, डॉ. सचिन चव्हाण तसेच प्राणीशास्त्र विभागाचे प्रयोगशाळा सहाय्यक जयवंत देशमुख, वसंत राऊत यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. शहाजी चंदनशिवे हे उपस्थित होते. त्यांनी पुढे बोलताना सांगितले की,  20 मार्च हा जगभरात जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो. महम्मद दिलवार यांनी 2006 मध्ये नेचर फोरेवर सोसायटी नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेच्या पुढाकारातून 2010 पासून जागतिक चिमणी दिन साजरा करण्यात येत आहे. चिमण्यांची संख्या दिवशी दिवस घटत आहे. चिमण्यांची कमी होत असलेली संख्या पर्यावरणीय समतोलासाठी धोकादाक आहे. हे लक्षात घेऊन या सोसायटीकडून जागतिक चिमणी दिनाची सुरुवात करण्यात आली. चिमणी हा पर्यावरणातील एक महत्त्वाचा घटक असल्याने चिमण्यांचे संवर्धन व्हावे म्हणून वीस मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जे लोक चिमण्यांच्या संवर्धनासाठी काम करतात अशा लोकांच्या संस्थेच्या वतीने जागतिक चिमणी दिनाच्या  निमित्ताने सत्कार देखील करण्यात येतो. दिवसेदिवस चिमण्यांच्या संख्येमध्ये घट होत आहे. गेल्या 15 ते 20 वर्षांमध्ये चिमण्यांची संख्या 85 टक्के घटली आहे. चिमणी हा सामान्यपणे मनुष्य वस्तीच्या शेजारी राहणारा पक्षी आहे. शहरांमध्ये मोठमोठ्या सिमेंटचे जंगले उभे राहिले. मोठे मोठे इमारती, घरे बांधण्यासाठी वृक्षांची बेसुमार कत्तल आणि सिमेंटच्या मजबुती इमारती उभारण्यात आल्याने चिमण्यांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाला. म्हणून त्यांची संख्या आज कमी प्रमाणात दिसत आहे. यावेळी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये चिमण्यांना पाणी पिण्यासाठी आणि त्यांना खाण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आली.


 
Top